ममता बनर्जींची लपवालपवी भाजपने आणली समोर!

नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. निवडणुकांत तृणमूल काँग्रेसने गड राखला तरीही ममता बॅनर्जी पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेवर निवडून जाणे मुख्यमंत्री ममता बनर्जींना आवश्यक आहे. बॅनर्जी यांनी आता भवानीपूर मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. भाजपने बॅनर्जी यांच्या विरोधात प्रियांका टिबरेवाल यांना तिकिट दिले आहे. …
 

नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. निवडणुकांत तृणमूल काँग्रेसने गड राखला तरीही ममता बॅनर्जी पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे सहा महिन्यांच्या आत विधानसभा किंवा विधान परिषदेवर निवडून जाणे मुख्यमंत्री ममता बनर्जींना आवश्यक आहे. बॅनर्जी यांनी आता भवानीपूर मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली आहे. भाजपने बॅनर्जी यांच्या विरोधात प्रियांका टिबरेवाल यांना तिकिट दिले आहे. बॅनर्जी यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या ५ गुन्ह्यांचा उल्लेख केला नसल्याचा आरोप भाजपने केला आहे. बॅनर्जी यांच्याविरुद्ध आसाममध्ये ५ गुन्हे दाखल आहेत. मात्र त्‍यांनी ही माहिती लपवली. त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करावा, अशी मागणी भाजप नेते सजल घोष यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्‍यांना ही पोटनिवडणूक जिंकणे आवश्यकच आहे. या निवडणुकीत बॅनर्जी यांचा पराभव झाल्यास त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागू शकते.