भावाच्या लग्नात हेलिकॉप्टरमधून उधळल्या नोटा

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील घटना इस्लामाबाद : लग्नसोहळा आगळावेगळा करण्यासाठी लोक काय काय करतील काही सांगता येत नाही. शिवाय लग्न समारंभात पाण्यासारखा पैसा खर्च करण्याचीही अनेकांची तयारी असते. पाकिस्तानातील सिंध प्रांतात बहाउद्दीन मंडी येथे घडलेल्या एका घटनेने वरील दोन्ही गोष्टींचा प्रत्यय आला. तेथे दुबईत काम करणार्या एका अब्जाधीश युवकाने त्याच्या भावाच्या लग्नसोहळ्यात चक्क हेलिकॉप्टरमधून नोटा व …
 

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील घटना

इस्लामाबाद : लग्नसोहळा आगळावेगळा करण्यासाठी लोक काय काय करतील काही सांगता येत नाही. शिवाय लग्न समारंभात पाण्यासारखा पैसा खर्च करण्याचीही अनेकांची तयारी असते. पाकिस्तानातील सिंध प्रांतात बहाउद्दीन मंडी येथे घडलेल्या एका घटनेने वरील दोन्ही गोष्टींचा प्रत्यय आला. तेथे दुबईत काम करणार्‍या एका अब्जाधीश युवकाने त्याच्या भावाच्या लग्नसोहळ्यात चक्क हेलिकॉप्टरमधून नोटा व फुले उधळली. त्यामुळे हा शाही विवाहसोहळा चर्चेचा विषय ठरला असून नोटा उधळण्याच्या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियातून व्हायरल होतो आहे. सिंध प्रांतात एका युवकाचा विवाह सोहळा होणार होता. त्याचा भाऊ दुबईत उद्योगपती आहे. त्याने भावाच्या लग्नात नोटा व फुले उधळण्यासाठी चक्क हेलिकॉप्टर भाड्याने घेतले होते. ठरल्याप्रमाणे त्याने नोटाही उधळल्या. हा प्रकार काही मिनिटे सुरू होता. पण आता त्यामुळे नवरदेवासह त्याच्या भावाच्याही अडचणी वाढल्या आहेत. मुळात पाकिस्तान महागाईने जनता होरपळत असताना अशाप्रकारे केल्या गेलेल्या उधळपट्टीवर अनेकांनी जोरदार टीका केली आहे. शिवाय हेलिकॉप्टरसाठी आवश्यक परवानग्या काढण्यात आलेल्या नव्हत्या, असा आक्षेप घेत स्थानिक प्रशासनाने नवरदेवाच्या भावाला नोटीस बजावली आहे.काही दिवसांपूर्वी गुंजरवाल भाग एका उद्योगपतीने मुलाच्या विवाहसोहळ्यात डॉलर उधळले होते.