पुरुषांचे वय वाढविण्याचे कामही करते व्हियाग्रा

संशोधनातून पुढे आलेली माहिती; दुसर्या हार्टअॅटॅकचा धोकाही करते कमी नवी दिल्ली : लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी पुरुषांचे हॉटफेव्हरिट मात्रा म्हणून व्हियाग्राकडे पाहिले जाते. जगभरात कोट्यवधी लोक दररोज तिचे सेवन करतात. पण आता हीच व्हियाग्रा त्यांच्या लैंगिक क्षमतेसोबतच त्यांचे वय वाढविण्यास व हृदयविकाराच्या दुसर्या धक्क्याची तीव्रता कमी करण्यास उपयुक्त ठरते,असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे, असा दावा स्वीडिश …
 

संशोधनातून पुढे आलेली माहिती; दुसर्‍या हार्टअ‍ॅटॅकचा धोकाही करते कमी

नवी दिल्ली : लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी पुरुषांचे हॉटफेव्हरिट मात्रा म्हणून व्हियाग्राकडे पाहिले जाते. जगभरात कोट्यवधी लोक दररोज तिचे सेवन करतात. पण आता हीच व्हियाग्रा त्यांच्या लैंगिक क्षमतेसोबतच त्यांचे वय वाढविण्यास व हृदयविकाराच्या दुसर्‍या धक्क्याची तीव्रता कमी करण्यास उपयुक्त ठरते,असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे, असा दावा स्वीडिश शास्त्रज्ञांनी केला आहे.
स्वीडिश शास्त्रज्ञांनी यासंदर्भात संशोधन केले आहे.त्यांनी असा दावा केला आहे की, व्हियाग्रा ही गोळी पुरुषांची लैंगिक क्षमता तर वाढवतेच. पण त्याच बरोबर यागोळीच्या सेवनामुळे हृदयाशी किंवा हार्टअ‍ॅटॅकशी संबंधित जोखीम कमी करण्यासही मदत करते. विशेष म्हणजे हृदयाशी संबंधित आजार/ तक्रारी असलेल्या पुरुषांचे आयुष्य वाढविण्यासही ही गोळी मदतकारी ठरते,असा दावा स्वीडिश संशोधकांनी केला आहे. काारोलिन्सका इन्स्ट्यिूटमधील हे संशोधन जर्नल ऑफ अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियालॉजीमध्ये प्रकाशित झाले आहे. प्रमुख संशोधक/ शास़्त्रज्ञ अ‍ॅन्डृयू ट्राफो यांनी डेली मेल या माध्यमाला सांगितले की, आम्ही केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष अतिशय उत्साहवर्धक आहेत.आम्ही १८ हजार २०० पुरुषांचे लक्षण व एकूण परीक्षण चाचण्या केल्या. त्यापैकी २००० जण हे पुरुष नपुसंकतावर उपचार करणार्‍या अन्य औषधींचे सेवन करत होते. नियमित व्हियाग्रा सेवन करणार्‍या पुरुषांना हार्टअ‍ॅटॅक, ह्रदयक्रिया बंद पडणे, बायपास आदींचे धोके तुलनेत कमी असल्याचे आढळून आले. शिवाय ही औषधी रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठीही काम करते. पण हाती आलेल्या परिणामांचे योग्य विश्लेषण आणि आणखी अभ्यास करणे गरजेचे आहे, असे शास़्ज्ञांनी स्पष्ट केले.