पाच पैशांत बिर्याणीची आयडियाची कल्पना हाॅटेलमालकाच्या अंगलट

चेन्नई : व्यवसाय चालावा, यासाठी कोण कोणते फंडे वापरील, याचा नेम नाही. चेन्नईतील एकाने सुकण्या बिर्याणी हाॅटेलची सुरुवात केली. हाॅटेल चालण्यासाठी त्यानं एक भन्नाट कल्पना लढविली. कालबाह्य झालेल्या आणि कुणाकडं फारसं नसलेल्या पाच पैशांत बिर्याणी देण्याचं त्यानं जाहीर केलं;परंतु हीच कल्पना त्याच्या अंगलट आली. गर्दीमुळं तो सर्वांना बिर्याणी देऊ शकला नाहीच; उलट त्याला शटर बंद …
 

चेन्नई : व्यवसाय चालावा, यासाठी कोण कोणते फंडे वापरील, याचा नेम नाही. चेन्नईतील एकाने सुकण्या बिर्याणी हाॅटेलची सुरुवात केली. हाॅटेल चालण्यासाठी त्यानं एक भन्नाट कल्पना लढविली. कालबाह्य झालेल्या आणि कुणाकडं फारसं नसलेल्या पाच पैशांत बिर्याणी देण्याचं त्यानं जाहीर केलं;परंतु हीच कल्पना त्याच्या अंगलट आली. गर्दीमुळं तो सर्वांना बिर्याणी देऊ शकला नाहीच; उलट त्याला शटर बंद करून घ्यावं लागलं.

हॉटेलच्या जाहिरातीसाठी मालकाने भन्नाट ऑफर दिली. पाच पैशांचे नाणे घेऊन येणाऱ्याला बिर्याणी अशी त्याची आॅफर होती. त्याला वाटलं,की फारच कमी लोकांकडं आता पाच पैशाचं नाण असेल. त्यामुळं पाच पैशात बिर्याणी देण्याची वेळ येणार नाही; परंतु प्रसिद्धी चांगली होऊन जाईल. त्याचा प्रसिद्धीचा अंदाज बरोबर ठरला; परंतु पाच पैसे घेऊन बिर्याणी घ्यायला शेकड्यांनी लोक जमा झाल्यानं त्याचं दिवाळं निघण्याची वेळ आली. ही आयडीया त्याच्या चांगलीच अंगलट आली. कोरोनाचं संकट चेन्नईमध्ये गंभीर असताना लोकांनी त्याची पर्वा न करता कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून गर्दी केली होती. हाॅटेलमालकाच्या आॅफरमुळे मोठा गोंधळ उडाला. चेन्नईतील सेल्लूर भागात असलेल्या या हॉटेलबाहेर बिर्याणी खाण्यासाठी भलीमोठी रांग लागली. पाच पैशाचं नाणे घेऊन अनेक जण आले. हॉटेलबाहेर 300 जण रांगेत उभे होते. गर्दीमुळे झालेल्या गोंधळामुळे हॉटेलमालकाला शटर खाली करावं लागलं. पाच पैशांचे नाणे देऊनही बिर्याणी न मिळाल्याची तक्रार लोकांनी पोलिसांकडे केली.