निवडणूक आयोगाच्या दाव्याने ममता बॅनर्जी तोंडघशी

आयोग म्हणाले ममतांवर हल्ला झालाच नाहीनवी दिल्ली : प. बंगालमध्ये निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोन दिवसांपूर्वी एका प्रचारसभेदरम्यान कारमध्ये बसताना जखमी झाल्या होत्या. त्यावेळी आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेसने केला होता. हा हल्ला भाजपकडूनच करण्यात आल्याचा अप्रत्यक्ष आरोप ममतांनी केला होता. त्यांवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. …
 

आयोग म्हणाले ममतांवर हल्ला झालाच नाही
नवी दिल्ली :
प. बंगालमध्ये निवडणुकीचे राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोन दिवसांपूर्वी एका प्रचारसभेदरम्यान कारमध्ये बसताना जखमी झाल्या होत्या. त्यावेळी आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा ममता बॅनर्जी व तृणमूल काँग्रेसने केला होता. हा हल्ला भाजपकडूनच करण्यात आल्याचा अप्रत्यक्ष आरोप ममतांनी केला होता. त्यांवरून जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. ममतांनी पायाला प्लास्टर घातलेले फोटो पोस्ट करून व्हिलचेअरवरून प्रचार करण्याची तयारी केली होती. त्यामुळे विरोधकांनी ही निवडणूक स्टंटबाजी होती व मतदारांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप केला होता. राज्य व केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. पोलीस व प्रशासनाच्या अहवालानंतर निवडणूक आयोगाने ममतांवर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. प्रचाराच्या गोंधळात घडलेला तो एक अपघात होता, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. पण त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याबद्दल काही सुरक्षा अधिकार्‍यांवर कारवाई केली आहे.