धक्कादायक… अर्ध्यापेक्षा जास्त बलात्कार प्रकरणातील आरोपी होतात निर्दोष मुक्त!
नवी दिल्ली : देशात दिवसाला ७७ बलात्काराच्या घटना होत असल्याचा धक्कादायक अहवाल एनसीआरबीने दिला आहे. मात्र याउलट केवळ ३२.२ टक्के प्रकरणातील आरोपी दोषी सिद्ध होतात, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. निर्भया बलात्कार प्रकरणानंतर दोषींना कठोर शिक्षा देणारा कायदा भारतीय संसदेने पारित केला होता. मात्र दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ ३२.२ टक्के आहे. २०१७ या …
Sep 19, 2021, 17:01 IST
नवी दिल्ली : देशात दिवसाला ७७ बलात्काराच्या घटना होत असल्याचा धक्कादायक अहवाल एनसीआरबीने दिला आहे. मात्र याउलट केवळ ३२.२ टक्के प्रकरणातील आरोपी दोषी सिद्ध होतात, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
निर्भया बलात्कार प्रकरणानंतर दोषींना कठोर शिक्षा देणारा कायदा भारतीय संसदेने पारित केला होता. मात्र दोषींना शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ ३२.२ टक्के आहे. २०१७ या वर्षात देशभरात १लाख ४६ हजार २०१ प्रकरणांची सुनावणी झाली. पैकी १८,३३३ प्रकरणांचा निकाल लागला. त्यात ५८८२ आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली. इतर आरोपींना पुरेशा पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले.