धक्कादायक : भाजप उमेदवाराच्या गाडीतच आढळले EVM

विरोधक झाले आक्रमक; निवडणूक आयोगाकडून ४ कर्मचारी निलंबित नवी दिल्ली : भाजपच्या काळात निवडणूक आयोगावर अनेकदा आरोप झाले आहेत. बटन कोणतेही दाबा,मत कमळालाच जाते, इथपासून ते ईव्हीएम हॅक करता येते, रिमोटद्वारे निकाल बदलता येत, असे आरोप आजवर विरोधकांनी केले आहेत.अर्थात यातील कुठलेच आरोप सिद्ध झाले नाहीत हा भाग वेगळा. विरोधकांच्या आरोपांनंतर ईव्हीएम सुरक्षित असल्याचा दावा …
 


विरोधक झाले आक्रमक; निवडणूक आयोगाकडून ४ कर्मचारी निलंबित

नवी दिल्ली : भाजपच्या काळात निवडणूक आयोगावर अनेकदा आरोप झाले आहेत. बटन कोणतेही दाबा,मत कमळालाच जाते, इथपासून ते ईव्हीएम हॅक करता येते, रिमोटद्वारे निकाल बदलता येत, असे आरोप आजवर विरोधकांनी केले आहेत.अर्थात यातील कुठलेच आरोप सिद्ध झाले नाहीत हा भाग वेगळा. विरोधकांच्या आरोपांनंतर ईव्हीएम सुरक्षित असल्याचा दावा आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केला. त्यामुळे न्यायालयानेही ईव्हीएम सुरक्षित असून ते हॅक करता येत नसल्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतरही आयोग आणि ईव्हीएमवरील संशय काही कमी झाला नाही. आता पाच राज्यांचा रणसंग्राम जारी असताना आसामात पाथरकंडी विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या गाडीतच ईव्हीएम मशीन सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही बाब उघड झाल्यावर विरोधकांनी आयोगावर टीका करत याप्रकरणी जाब विचारला. तसेच कारवाईची मागणी केली. निवडणूक आयोगाने यातील दोषी चार अधिकार्‍यांना निलंबित केले आहे.

आसाममध्ये गुरुवारी दुसर्‍या टप्प्यात विधानसभेच्या ३९ जागांवर मतदान घेण्यात आले. दिवसभरात मतदान पार पडल्यानंतर सायंकाळी पाथरकंडी विधानसभा मतदारसंघातील भाजचे उमेदवार आमदार कृष्णेंद्रू पॉल यांच्या कारमध्ये ईव्हीएम मशीन आढळून आले. त्याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस व इतर पक्षांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला. आयोगाने याप्रकरणी खुलासा करावा तसेच दोषींवर कारवाई करावी,अशी मागणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केली.याप्रकरणी त्यांनी भाजपवर आरोप केला आहे. यानंतर निवडणूक आयोगाने त्या घटनेची गंभीर दखल घेत चार अधिकारी, कर्मचार्‍यांना निलंबनची कारवाई केली आहे तसेच घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.या मतदारसंघातील काही केंद्रांवर फेरमतदानही घेतले जाणार आहे. निवडणूक आयोगाची गाडी बंद पडल्यानंतर ईव्हीएम नेण्यासाठी त्या गाडीची मदत घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.