दोन मुलांच्‍या बापाला आवडू लागली होती अल्पवयीन मुलगी..त्‍यासाठी त्‍याने काय केले क्रौर्य वाचा…

माझे प्रेम आहे, आपण लग्न करू म्हणून देत होता त्रास रायपूर : एकाच वस्तीमधील दोन मुलांचा पिता असलेल्या इसमाला अल्पवयीन मुलगी आवडू लागली. त्याचे तिच्यावर प्रेम जडले. त्याने लग्न करण्यासाठी मागणी घातली. तिने नकार देताच त्याने चक्क रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. घटनेत पीडित मुलगी ५० टक्के भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू …
 

माझे प्रेम आहे, आपण लग्न करू म्हणून देत होता त्रास

रायपूर : एकाच वस्तीमधील दोन मुलांचा पिता असलेल्या इसमाला अल्पवयीन मुलगी आवडू लागली. त्याचे तिच्यावर प्रेम जडले. त्याने लग्न करण्यासाठी मागणी घातली. तिने नकार देताच त्याने चक्क रॉकेल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. घटनेत पीडित मुलगी ५० टक्के भाजली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना रायपूर जिल्ह्यात सेरीखेडा ठाण्याअंतर्गत घडली. तेथील १६ वर्षीय पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहते. तिच्या पित्याच्या वयाचा आरोपी त्याच वस्तीत राहत होता. गेल्या चार-पाच महिन्यांपासून तो तिच्या मागेमागे करत तिचा पाठलाग करत होता. दोन दिवसांपूर्वी त्याने तिला एकटे गाठून माझे तुझ्यावर प्रेम जडल्याचे व आपण लग्न करू असे सांगितले. मुलीने त्यास नकार देऊन ही घटना वडिलांना सांगितली. त्यांनीही त्याला समजावून सांगितले. पण बिथरलेल्या नराधमाने रागाच्या भरात रॉकेल अंगावर ओतून अल्पवयीन मुलीला चक्क पेटवून दिले.सदर मुलगी ५० टक्के भाजली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.