दिवसाला ८० खून; ७७ बलात्कार!

नवी दिल्ली : देशात २०२० या वर्षातील गुन्ह्यांची आकडेवारी एनसीआरबीने (राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग) जाहीर केली आहे. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. २०२० या वर्षात देशात दिवसाला ८० खून आणि ७७ बलात्काराच्या घटना घडल्याचे अहवालात म्हटले आहे. २०१९ या वर्षाच्या तुलनेत २०२० मध्ये या गुन्ह्यांमध्ये १ टक्क्याने वाढ झाली आहे. २०२० मध्ये २९९९३ …
 

नवी दिल्ली : देशात २०२० या वर्षातील गुन्ह्यांची आकडेवारी एनसीआरबीने (राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग) जाहीर केली आहे. यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

२०२० या वर्षात देशात दिवसाला ८० खून आणि ७७ बलात्काराच्या घटना घडल्याचे अहवालात म्हटले आहे. २०१९ या वर्षाच्या तुलनेत २०२० मध्ये या गुन्ह्यांमध्ये १ टक्क्याने वाढ झाली आहे. २०२० मध्ये २९९९३ जणांचा खून झाला. यामध्ये उत्तरप्रदेश मध्ये सर्वाधिक ३३७९ जणांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. बिहारमध्ये ३१५० तर महाराष्ट्रात २१६३ जणांची हत्या करण्यात आली आहे. २०२० या वर्षात देशात बलात्काराच्या २८,०४६ घटनांची नोंद करण्यात आली. यात सर्वाधिक बलात्कार राजस्थान राज्यात घडले. राजस्थानमध्ये ५३१०, उत्तरप्रदेशात २७६९,मध्यप्रदेशात २३३९ तर महाराष्ट्रात २०६१ बलात्काराच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे.