दारू पिऊन मराल तर विमा देण्यास कंपनी बांधिल नाही

नवी दिल्ली : मद्यपी मंडळींचे प्रमाण समाजात वाढत आहे. अनेक व्यक्ती दारू पिऊन प्रवास करतात.बेफाम गाडी चालवलात. त्यात एखादी दुर्घटना घडली तर विमा कंपनीने त्यासाठीही भरपाई द्यावी, अशी विमाधारकांची अपेक्षा असते. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे अनेकांची कोंडी होणार आहे. कारण दारू ढोसून तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या वारसांना भरपाई देण्यासाठी कंपनी बांधिल असणार …
 

नवी दिल्ली : मद्यपी मंडळींचे प्रमाण समाजात वाढत आहे. अनेक व्यक्ती दारू पिऊन प्रवास करतात.बेफाम गाडी चालवलात. त्यात एखादी दुर्घटना घडली तर विमा कंपनीने त्यासाठीही भरपाई द्यावी, अशी विमाधारकांची अपेक्षा असते. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे अनेकांची कोंडी होणार आहे. कारण दारू ढोसून तुमचा मृत्यू झाला तर तुमच्या वारसांना भरपाई देण्यासाठी कंपनी बांधिल असणार नाही, असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे.
हिमाचल प्रदेशातील सिमला येथे एका चौकीदाराच्या विमा रकमेसंदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने वरील निर्वाळा दिला आहे. १९९७ मध्ये एका दुर्घटनेत चौकीदाराचा मृत्यू झाला होता. परंतु त्यावेळी त्याने अत्याधिक प्रमाणात दारू ढोसली होती. अतिमद्यप्राशनामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातही नमूद करण्यात आले होते.त्याच्या वारसांनी विम्याच्या रकमेसाठी ग्राहक न्यायालयात धाव घेतली होती. पण ग्राहक न्यायालयाने या केसमध्ये विम्याची रक्कम देण्याचे बंधन किंवा जबाबदारी कंपन्यावर असू शकत नाही. असे स्पष्ट करून दावा फेटाळून लावला होता. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुनावणीसाठी आले. सर्वोच्च न्यायलयानेही अतिमद्यप्राशनाने मृत्यू झाल्यास भरपाई विमा देण्यास कंपन्या बांधिल नाही. कारण चौकीदाराचा मृत्यू हा अपघाती झालेला नाही, असे स्पष्ट करून दावा निकाली काढला.