तुम्‍हाला माहितेय, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे किती आहे सोनं अन्‌ संपत्ती… ही बातमी वाचल्यावर तुम्‍हाला धक्का बसेल!

नवी दिल्ली : देशातील राजकीय नेत्यांच्या संपत्तीबद्दल सामान्य नागरिकांना नेहमीच उत्सुकता असते. राजकीय पदे उपभोगत असताना अनेक नेत्यांची संपत्ती हजारपटीने वाढल्याची उदाहरणे भारतीयांना नवीन नाहीत. या पार्श्वभूमीवर ना खाऊंगा और न खाने दुंगा म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपत्ती किती असेल, याविषयी वेगवेगळे तर्क लावले जातात. नरेंद्र मोदी साडेसात वर्षांपासून देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान आहेत. ३१ मार्च …
 

नवी दिल्ली : देशातील राजकीय नेत्यांच्या संपत्तीबद्दल सामान्य नागरिकांना नेहमीच उत्सुकता असते. राजकीय पदे उपभोगत असताना अनेक नेत्यांची संपत्ती हजारपटीने वाढल्याची उदाहरणे भारतीयांना नवीन नाहीत. या पार्श्वभूमीवर ना खाऊंगा और न खाने दुंगा म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपत्ती किती असेल, याविषयी वेगवेगळे तर्क लावले जातात. नरेंद्र मोदी साडेसात वर्षांपासून देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान आहेत. ३१ मार्च २०२१ रोजी त्यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली आहे.

सध्या मोदींकडे ३ कोटी ७ लाख रुपयांची संपत्ती आहे. शेअर बाजारात तेजी असतानासुद्धा मोदींनी आतापर्यंत कधीही शेअर बाजारात गुंतवणूक केली नाही. गुजरातमधील गांधीनगरच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ब्रँचमध्ये त्यांच्या नावावर १ कोटी ८६ लाख रुपयांची एफडी आहे. गेल्या वर्षी ही रक्कम १ कोटी ६ लाख एवढी होती. पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोणतेही वाहन नाही. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी कोणतीही मालमत्ताही खरेदी केलेली नाही.

२००२ मध्ये मोदींनी गांधीनगर येथे घर घेतले होते. त्या घराची किंमत सध्या एक कोटी १० लाख एवढी आहे. मात्र त्यातसुद्धा पंतप्रधानांची संयुक्त मालकी असून, त्यातील केवळ २५ टक्के भाग त्यांच्या नावावर आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांची संपत्ती २ कोटी ८५ लाख एवढी होती. यावर्षी १२ महिन्यांत त्यात २२ लाखांची भर पडली आहे. मोदींकडे सोन्याच्या चार अंगठ्या आहेत. त्याची किंमत १ लाख ४८ हजार एवढी आहे.