जेएनयू परिसरात उधळले गेले ’अश्लील परेड’चे रंग

व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल; मुलींनी केली तक्रार; प्रशासनाला पत्ताच नाही नवी दिल्ली : विविध कारणांनी चर्चेत असलेल्या राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) एक गंभीर प्रकरण समोर आले असून जेएनयू कॅम्पसमध्ये मुलींच्या हॉस्टेलसमोर होळीच्या दिवशी तरुणांनी चक्क ’अश्लील परेड’ काढल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर युवा वर्गात खळबळ उडाली आहे. आता …
 

व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल; मुलींनी केली तक्रार; प्रशासनाला पत्ताच नाही

नवी दिल्ली : विविध कारणांनी चर्चेत असलेल्या राजधानी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) एक गंभीर प्रकरण समोर आले असून जेएनयू कॅम्पसमध्ये मुलींच्या हॉस्टेलसमोर होळीच्या दिवशी तरुणांनी चक्क ’अश्लील परेड’ काढल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल झाल्यानंतर युवा वर्गात खळबळ उडाली आहे. आता याप्रकरणाच्या चौकशीची तसेच दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. काही तरुणींनी त्याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रारही केली आहे.
प्राप्त माहितीनुसार होळीच्या दिवशी विद्यापीठ कॅम्पस परिसरात तरुणांनी अर्धनग्न अवस्थेत मुलींच्या शिप्रा आणि कोयना हॉस्टेलसमोर अर्धनग्‍न अवस्थेत रॅम्पवॉक करत अश्लील परेड काढली. इतकेच नव्हे तर मुलींकडे पाहून अश्लील इशारेदेखील केले. अर्थात ही मुले जेएनयूचे विद्यार्थी होते की, बाहेरचे तरुण होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विशेष म्हणजे परेड सुरू असताना सुरक्षा गार्ड्सनी तरुणांना रोखण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून काही विद्यार्थिनींनी या घटनेची तक्रार विद्यापीठाच्या लैंगिक शोषण तक्रार निवारण समितीकडे केली आहे. जेएनयूच्या विद्यार्थी संघनेनेही घटनेबाबत प्रशासनाने कठोर कारवाईची मागणी केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खडबडून जागे झालेल्या विद्यापीठ प्रशासनाने चौकशीचे संकेत दिले आहेत.