चीनची लस घेतल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रानखान पॉझिटिव्ह

दोन दिवसांपूर्वीच घेतली होती कोरोनाची लस इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची बाधा झाली आहे.विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच त्यांनी चीनने पुरवठा केलेली कोरानाची लस घेतली होती.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चीनने पाकिस्तानला आतापर्यंत पाच लाख व्हॅक्सिनचा पुरवठा केला आहे. विशेष म्हणजे हा पुरवठा चीनने मोफत केला होता. ह लस आल्यानंतर इम्रान खान यांनी त्याचा पहिला …
 

दोन दिवसांपूर्वीच घेतली होती कोरोनाची लस

इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोरोनाची बाधा झाली आहे.विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच त्यांनी चीनने पुरवठा केलेली कोरानाची लस घेतली होती.कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चीनने पाकिस्तानला आतापर्यंत पाच लाख व्हॅक्सिनचा पुरवठा केला आहे. विशेष म्हणजे हा पुरवठा चीनने मोफत केला होता. ह लस आल्यानंतर इम्रान खान यांनी त्याचा पहिला डोस दोन दिवसांपूर्वीच घेतला. इतर लसींप्रमाणेच कोरोना संसर्ग पूर्णपणे रोखण्यासाठी ठराविक कालावधीनंतर लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक आहे.पाकिस्तानात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतो आहे. यावर्षी पहिल्यांदाच शनिवारी एकाच दिवशी कोरोनाचे जवळपास चार हजार रुग्ण आढळून आले होते. पाकिस्तान लसीच्या बाबतीत पूर्णपणे चीनवर अवलंबून आहे. कारण स्वत:ची लस शोधणे किंवा इतर देशांकडून ती खरेदी करण्याबाबत इम्रान खान सरकारने अद्याप कुठलीच पावले उचलली नाहीत. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.कोरोनामुळे पाकिस्तानात आतापर्यंत ६ लाख १५ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून १३ हजार ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे. इम्रान खान यांनी तिसरी लाट लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.