ऑफिसमधील महिला कर्मचाऱ्यांना म्हणत होता “माय लव्ह, स्विटी, हनी…’; कंपनीने कामावरून काढून टाकले!

लंडन : कार्यालयांत महिला आणि पुरुष एकत्र काम करतात. त्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्रीही होते. मात्र काही जण मैत्रीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. काही पुरुष महिला सहकाऱ्यांचा लैंगिक छळही करतात. लंडनमध्ये एका कंपनीत एक असेच प्रकरण समोर आले आहे. चेस्टरमधील एका कंपनीत माईक हार्ट नावाचा तरुण काम करत होता. तो त्याच्या सहकारी महिलांसोबत जवळीक साधायचा प्रयत्न …
 

लंडन : कार्यालयांत महिला आणि पुरुष एकत्र काम करतात. त्यामुळे त्‍यांच्‍यात चांगली मैत्रीही होते. मात्र काही जण मैत्रीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. काही पुरुष महिला सहकाऱ्यांचा लैंगिक छळही करतात. लंडनमध्ये एका कंपनीत एक असेच प्रकरण समोर आले आहे.

चेस्टरमधील एका कंपनीत माईक हार्ट नावाचा तरुण काम करत होता. तो त्याच्या सहकारी महिलांसोबत जवळीक साधायचा प्रयत्न करत होता. महिला कर्मचाऱ्यांना तो नावाने कधीच हाक मारत नव्हता. त्याऐवजी हनी, स्विटी, माय लव्ह… अशी संबोधने वापरून बोलत होता. एका महिला कर्मचाऱ्याने कंपनी व्यवस्थापनाकडे त्‍याची तक्रार केली. कंपनी व्‍यवस्‍थापनाने लागलीच चौकशी समिती नेमली. या समितीने सर्व महिला आणि अन्य सहकाऱ्यांशी चर्चा केली. तो अहवाल व्यवस्‍थापनाला सादर केला. अहवाल माईक हार्टच्‍या विरोधात गेल्याने त्याला तातडीने कामावरून काढून टाकण्यात आले. त्‍याने या विरोधात न्यायालयात तक्रार केली. मात्र कंपनीने केलेली कारवाई योग्य असल्याचे न्यायालयानेही म्हटले आहे.