एकीकडे हनुमान चालिसा पठण, दुसरीकडे मेंदूवर शस्त्रक्रिया
नवी दिल्ली ः वैद्यकीय उपचार महत्वाचे आहेत; परंतु कधी कधी वैद्यकीय उपचारापेक्षाही श्रद्धा अधिक महत्त्वाची असते. एका महिला मेंदूची अवघड आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुरू असताना हनुमान चालिसा वाचत होती.दिल्लीतील एम्सच्या डॉक्टरांनी ब्रेन ट्युमर शस्त्रक्रिया यशस्वी केली.
दिल्लीतील शाहदरा भागातील 24 वर्षीय तरुणीच्या मेंदूत वेगवेगळ्या भागात ट्यूमर होते. तिच्या मेंदूतील मज्जातंतूही प्रतिसाद देत नव्हते. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ऑपरेशनच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान ती सावध होती. ती हनुमान चालिसा वाचत होती. विशेष म्हणजे तिच्याबरोबर रुग्णालयातील न्यूरो विभागाचे डॉक्टरही हनुमान चालिसा म्हणत होते.
तिच्या डोक्याच्या आतील नसा वेगवेगळ्या रंगांसह रेकॉर्ड केल्या गेल्या. वैद्यकीय भाषेत त्याला ट्रॅक्टोग्राफी म्हणतात. या आधुनिक तंत्रज्ञानासह ऑपरेशन करताना फार त्रास होत नाही. रुग्णाला बेशुद्ध न करता शस्त्रक्रिया करता येते. साध्या ब्रेन ट्यूमर शस्त्रक्रियेमध्ये रुग्ण जागृतावस्थेत असतो. शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या मेंदूच्या परिणामाचे बोलण्याच्या क्षमतेचे परीक्षण केले जाऊ शकत नाही; परंतु नव्या तंत्राद्वारे शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची बोलण्याची क्षमता वारंवार तपासली जाऊ शकते. या क्षमतेची चाचणी घेण्यासाठी, रुग्णाला बोलते करावे लागते. अशा परिस्थितीत धार्मिक असलेल्या लोकांकडे हनुमान चालिसापेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही.