इशरत जहां दहशतवादीच होती-सीबीआय कोर्टाचे शिक्कामोर्तब
गुजरातच्या तीन पोलीस अधिकार्यांची निर्दोष मुक्तता
अहमदबाद : देशभर गाजलेल्या गुजरातमधील इशरत जहां एन्काउंटरप्रकरणी सुनावणी करताना सीबीआय न्यायालयाने इशरत जहां ही लष्कर-ए-तोयबाची दहशतवादीच होती. त्यासंदर्भात गुप्तचर विभागाने पुरावे आणि अहवाल फेटाळता येणार नाही, असे स्पष्ट करत याप्रकरणी तीन पोलीस अधिकार्यांची निर्दोष मुक्तता केली.
गुजरातमध्ये अहमदाबाद येथे १५ जून २००४ रोजी कोतरपूर वॉटरवर्क्सजवळ पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत इशरत जहां व तिचे साथीदार जावेद शेख, अहजद राम आणि जीशान जौहर हे ठार झाले होते.हे सर्वजण लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी होते. आणि तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याच्या उद्देशाने ते अहमदाबादेत आले होते, असा दावा गुप्तचर विभागाने अहवालात दिला होता.परंतु त्यावेळी हे कथित एन्काउंटर केवळ गुजरातच नव्हे तर देशभर गाजले होते.त्याविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या होत्या. इशरत जहांची आई समीमा कौसर, जावेदचे वडील गोपीनाथ पिल्लई यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून आपली मुले निर्दोष होते. ते दहशतवादी नव्हती. तरीही पोलिसांनी त्यांचे एन्काउंटर केले. संबंधित पोलिस अधिकार्यांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.याप्रकरणी त्यांच्या मागणीवर हायकोर्टाने एसआयटी नेमून चौकशी केली होती. त्यानंतर तीन अधिकार्यांना
अटकही झाली होती. परंतु सीबीआय कोर्टाने आयपीएस सिंघल, निवृत्त पोलीस उपअधीक्षक तरुण बारोट, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंजू चौधरी यांची निर्दोष मुक्तता केली होती.इशरत जहां ही दहशतवादी होती व पोलीस अधिकार्यांनी त्यांचे कर्तव्य बजावले,असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.