आश्चर्यजनक बातमी ः हे वाचा, तुम्‍ही रात्री नखं कापणं बंद कराल..!

बुलडाणा ः रात्रीला नखं कापावेत किंवा नाही याबाबतीत बरेच समज आणि गैरसमज आहेत. काही अंधश्रद्धासुद्धा आहेत. रात्रीला नखं कापू नयेत, असं घरातील आजी-आजोबा नेहमी सांगत असतात. रात्री नखं कापल्यावर माणूस आजारी पडतो, असे सांगितले जाते. मात्र काय असेल यामागचं खरं कारण जाणून घेऊया… आपली नखं ही केरोटीनपासून तयार होत असतात. पाण्यात काम केले की नखं …
 

बुलडाणा ः रात्रीला नखं कापावेत किंवा नाही याबाबतीत बरेच समज आणि गैरसमज आहेत. काही अंधश्रद्धासुद्धा आहेत. रात्रीला नखं कापू नयेत, असं घरातील आजी-आजोबा नेहमी सांगत असतात. रात्री नखं कापल्यावर माणूस आजारी पडतो, असे सांगितले जाते. मात्र काय असेल यामागचं खरं कारण जाणून घेऊया…

आपली नखं ही केरोटीनपासून तयार होत असतात. पाण्यात काम केले की नखं मुलायम होतात आणि ती काढायला सुद्धा सोपी जातात. मात्र आपण रात्री सहसा पाण्यात काम करत नाही. त्यामुळे रात्री नखं कठोर असतात. त्यात मुलायमपणा नसतोच. त्यामुळे रात्री नखे काढायला कठीण जातात. नखे काढताना चुकीने बोटाला जखम होण्याचीसुद्धा शक्यता असते. टाईट नखं मध्येच तुटतात. त्यामुळे नखांचा आकार बिघडतो. इन्फेक्शन होण्याचा सुद्धा धोका वाढतो. त्यामुळे शक्यतो रात्री नखे कापूच नयेत. अंघोळ केल्यानंतर नखे कापणे सोयीचे जाते. साबण आणि पाण्यामुळे नखे मुलायम व मऊ होतात. त्यामुळे नखे सहजपणे काढता येतात. काढताना त्रास सुद्धा होत नाही.

अशी घ्या काळजी
नखं कापण्यापूर्वी हात ओले करून घ्यावेत किंवा एखाद्या भांड्यात पाणी घेऊन त्यात १० मिनिटं हात बुडवून ठेवावेत. कोमट पाण्यात हात बुडवून ठेवावा व त्यानंतर नखे काढावीत. नखं कापण्यासाठी नेलकटर सुद्धा चांगले वापरले पाहिजे. इंफेक्शन होऊ नये म्हणून स्वतःचे नेलकटर वापरावे.