STATE NEWS लग्न होऊन आठ महिने झाले तरी नवरा जवळ येईना! सत्य कळताच नवविवाहितेला बसला धक्का; थेट पोलिसांत जाऊन म्हणाली....

 
पुणे( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): लग्न होऊन आठ महिने झालेत मात्र तरीही पती जवळ येत नाही. जवळ झोपण्याऐवजी बायकोच्या दूर झोपतो. त्याला याबद्दल पत्नीने जेव्हा विचारणा केली तेव्हा त्याचं उत्तर एकूण पत्नीला मोठा धक्का बसला. अखेर तिने पोलीस ठाण्यात धाव घेत "बिनकामाच्या" नवऱ्याची तक्रार दिली. पुण्यातल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या चंदननगर परिसरात हा प्रकार समोर आलाय. विवाहित महिलेची तक्रार ऐकून पोलिसही चक्रावून गेलेत.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विवाहिता ३० वर्षांची आहे. महिला बी.टेक.आणि एम.बी. ए अशी उच्चशिक्षित आहे. महिलेचा पती ३२ वर्षांचा असून तोही उच्चशिक्षित असून एका नामांकित कंपनीत इंजिनियर आहे. जून २०२२ मध्ये दोघांचे लग्न झाल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

  लग्नानंतर दोघेही हनिमून साठी मालदीव ला गेले. मात्र तिथे तिच्या सप्नांचा पचका झाला. तिथे पती पत्नी प्रमाणे दोघांमध्ये शारीरिक संबंध आले नाहीत असे तिने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर सुद्धा पतीकडून शारीरिक संबंधासाठी टाळाटाळ सुरू होती. दरम्यान आता लग्न होऊन आठ महिने झालेत मात्र अजून एकदाही पतीने शारीरिक संबधासाठी पुढाकार घेतला नाही. जिव्हा तिने पुढाकार घेतला तेव्हा तो दूर दूर पळायचा असेही तक्रारीत नमूद आहे.  दरम्यान जेव्हा तिने पतीकडे याबाबत विचारणा केली तेव्हा पती शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ असल्याचे तिला कळाले. मला शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छाच होत नाही असे उत्तर त्याने दिले. नवऱ्याचे उत्तर ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले पण त्यानंतरही तिच्या आयुष्यात बरच काही घडल. बायकोला सत्य कळल्यावर तिने या प्रकाराची कुठेही वाच्यता करू नये म्हणून नवरा तिला निर्दयी होऊन मारू लागला. अखेर हा प्रकार सहन न झाल्याने तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. नवऱ्याने फसवणूक केल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.