पतीच्या बेडवरून उठून दुसऱ्या खोलीत प्रियकराकडे गेली...

असे फुटले बिंग!!
 

अंबाला : बाळाच्या रडण्याच्या आवाजाने तो उठला... पाहतो तर बेडवर बायकोचा पत्ताच नाही. घरात शोधले तर ती एका खोलीत होती. तिला इथे येण्याचं कारण विचारलं तर त्‍या खोलीतच ती झोपणार असल्याचे तिने सांगितले. पण पतीला संशय आला. त्‍याने खोलीत इकडे तिकडे पाहिले तर दरवाजाच्या मागे गावातीलच अक्षय नावाचा तरुण होता. बिंग फुटल्याने अक्षय आणि त्‍याच्या पत्‍नीने त्‍याच्‍या डोक्‍यात वस्तूने वार केला आणि दोघे छतावरून उडी मारून पसार झाले. ही लाजीरवाणी घटना हरियाणातील अंबाला जिल्ह्यात समोर आली आहे. पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीत पतीने म्हटले आहे, की काल रात्री खोलीत पत्‍नी व बाळासह झोपला होता. बाळाच्या रडण्याने मध्यरात्री जाग आली. त्यावेळी पत्नी अंथरुणावर नव्हती. दुसऱ्या खोलीत ती प्रियकरासोबत रासलीला मनवत होती. हा प्रकार समोर आल्यानंतर गोंधळ उडाला. दोघांना रंगेहात पकडल्यामुळे पत्‍नी आणि तिच्या प्रियकराने त्‍याच्‍यावर हल्ला चढवत पळ काढला. आवाजाने सर्व जागे झाले. शेजाऱ्यांनीही दोघांचा शोध घेतला. मात्र ते मिळून आले नाहीत. त्‍यानंतर पोलिसांत तक्रार देण्यात आली. पत्‍नीच्या अफेअरची माहिती पतीला आधीपासून आहे. तीन महिन्यांपूर्वी गावात पंचायत बोलावून त्‍याने पत्‍नीबद्दल तक्रारही केली होती. मात्र पत्‍नीने माफी मागवून यापुढे असे चुकीचे पाऊल टाकणार नसल्याचे सांगितले होते. मात्र त्‍यानंतरही हा प्रकार घडल्याने पोलिसांत प्रकरण गेले आहे.