National News : हॉटेलच्या खोलीत जोडप्याने केलेला विवाह हायकोर्टाने ठरवलं रद्द!; कारण…

नवी दिल्ली : घरच्यांचा विरोध असल्याने जोडप्याने हॉटेलच्या खोलीत लग्न उरकले. मात्र जेव्हा घरच्यांपासून सुरक्षा मिळण्याची मागणी करण्यासाठी डप्याने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हा हायकोर्टाने या लग्नाला अवैध ठरवले. याशिवाय जोडप्याला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. २० वर्षांची तरुणी आणि १९ वर्षांच्या तरुणात प्रेमसंबंध होते. दोघांच्या कुटुंबियांना जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा …
 

नवी दिल्ली : घरच्यांचा विरोध असल्याने जोडप्याने हॉटेलच्या खोलीत लग्न उरकले. मात्र जेव्हा घरच्यांपासून सुरक्षा मिळण्याची मागणी करण्यासाठी डप्याने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली. तेव्हा हायकोर्टाने या लग्नाला अवैध ठरवले. याशिवाय जोडप्याला २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

२० वर्षांची तरुणी आणि १९ वर्षांच्या तरुणात प्रेमसंबंध होते. दोघांच्या कुटुंबियांना जेव्हा याबाबत माहिती मिळाली तेव्हा विरोध सुरू झाला. त्यामुळे पळून जाऊन या जोडप्याने एका हॉटेलच्या खोलीत भांड्यात होम हवन करून लग्न उरकले. अग्नीला साक्षी मानून सातफेरे घेतले. एकमेकांना कुंकू लावले. हार घातले मात्र कोणत्याही मंत्रांचे पठण केले नाही. याशिवाय या लग्नाला पुरावा म्हणून तिसरे कुणीही उपस्थित नव्हते. लग्न झाल्याचा एक फोटोदेखील जोडप्याने काढला नाही. कोर्टाकडे सुरक्षा मागताना मुलाचे वय १९ असताना जोडप्याने चुकीची माहिती दिली. मुलाचे वय कमी असल्याने हा विवाह अवैध आहे. कोर्टाला चुकीची माहिती देऊन कोर्टाचा वेळ वाया घालविला म्हणून २५ हजारांचा दंड जोडप्याला सुनावण्यात आला. मात्र जोडप्याच्या जीवाला धोका असल्याने जोडप्याला सुरक्षा पुरविण्याचे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत.