National News : दहा वर्षांनी लहान दिराच्या प्रेमात पडली; पण पाप शेवटी पापच!, व्हायचे तेच झाले!
रायपूर : ३२ वर्षीय महिला स्वतःपेक्षा १० वर्षांनी लहान असलेल्या दिराच्या प्रेमात पडली. दोघांचे प्रेम बहरत गेले. मात्र गावभर चर्चा झाल्याने बदनामीच्या भीतीपोटी दीर आणि वहिनीचे नाते असलेल्या दोघांनी झाडाला गळफास घेतला. दोन दिवसांपूर्वी छत्तीसगढमधील सुरजपूर येथे ही घटना उघडकीस आली.
अनिता सिंह (३२) आणि शिवा सिंह (२२) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. अनिता सूरजच्या मोठ्या भावाची बायको होती. दोघांचेही प्रेम चांगले बहरले होते. कुटूंबियांना ही बातमी कळली होती. गावभरही दोघांचे लफडे सुरू असल्याची चर्चा जोरात होती. अनिता २० सप्टेंबर रोजी रात्री घरातून निघून गेली. त्याच वेळी शिवासुद्धा घरात नव्हता. दोघांचा रात्रभर शोध घेतला. २१ सप्टेंबर रोजी सकाळी दोघांचे मृतदेह गावशेजारच्या एका झाडाला लटकलेले दिसले.