National News : ड्रायव्हरचा कारनामा; अंघोळ करताना काढला महिला पोलीस अधिकाऱ्याचा नग्न व्हिडिओ!

भोपाळ : एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचा अंघोळ करतानाचा नग्न व्हिडिओ काढल्याचे प्रकरण मध्यप्रदेशात समोर आले आहे. हा व्हिडिओ चित्रित करणारा दुसरा तिसरा कुणी नसून महिला पोलीस अधिकाऱ्याचा पोलीस कॉन्स्टेबल असलेला चालक आहे. भोपाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी चालक पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भूपेंद्र सिंह असे आरोपी शिपायाचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून …
 

भोपाळ : एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याचा अंघोळ करतानाचा नग्न व्हिडिओ काढल्याचे प्रकरण मध्यप्रदेशात समोर आले आहे. हा व्हिडिओ चित्रित करणारा दुसरा तिसरा कुणी नसून महिला पोलीस अधिकाऱ्याचा पोलीस कॉन्स्टेबल असलेला चालक आहे. भोपाळच्या स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी चालक पोलीस शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भूपेंद्र सिंह असे आरोपी शिपायाचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरारी आहे.

महिला पोलीस अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार, २२ सप्टेंबरला अंघोळ करत असताना बाथरूमच्या दाराखालून कुणीतरी कॅमेऱ्याने शूटिंग करत असल्याचे त्यांना दिसले. त्या बाथरूममधून येताच आरोपी पळून गेला. २६ सप्टेंबरला चालक भूपेंद्र सिंहने महिला पोलीस अधिकाऱ्याला ५ लाख रुपये मागितले. पैसे न दिल्यास सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करण्याची धमकी दिली. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ भोपाळच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या यासंदर्भात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. गुन्हा दाखल होत असल्याची कुणकुण लागताच चालक फरारी झाला.