NATIONAL NEWS : “घरात पैसेच नव्हते तर घराला लॉक का केलं, कलेक्टर…!’; चोरट्यांनी जाता जाता उपजिल्हाधिकाऱ्यांनाच लिहिली चिठ्ठी!!

इंदौर : मध्यप्रदेशातील देवास येथील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी चोरी झाली. घर तर फोडलेच. पण या अट्टल चोरट्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांसाठी एक चिठ्ठीसुद्धा लिहून ठेवली. “जर घरात पैसेच नव्हते तर घर लॉक कशाला केलं कलेक्टर?’ असं या चिठ्ठीत लिहिलं आहे. विशेष म्हणजे याच परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षकांचे सुद्धा निवासस्थान आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे. देवासचे उपजिल्हाधिकारी …
 

इंदौर : मध्यप्रदेशातील देवास येथील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी चोरी झाली. घर तर फोडलेच. पण या अट्टल चोरट्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांसाठी एक चिठ्ठीसुद्धा लिहून ठेवली. “जर घरात पैसेच नव्हते तर घर लॉक कशाला केलं कलेक्टर?’ असं या चिठ्ठीत लिहिलं आहे.

विशेष म्हणजे याच परिसरात जिल्हा पोलीस अधीक्षकांचे सुद्धा निवासस्थान आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे. देवासचे उपजिल्हाधिकारी त्रिलोचन गौर १०-१५ दिवसांपासून घरी नव्हते. घरी आल्यानंतर त्यांना घरातील सामान विस्कटलेले दिसले. त्यानंतर ३० हजार रुपयांची रोख रक्कम व काही दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्‍या लक्षात आले. यावेळी त्यांना चोरट्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळली. घरात अल्प रक्कम मिळाल्यामुले चोर नाराज झाले असावेत, असंच या चिठ्ठीवरून दिसतंय.