National News ः मुख्याध्यापकाने घेतला विद्यार्थिनीच्या गालाचा चावा; गावकऱ्यांनी धो धो धुतले!

पटना : शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतील एका १२ वर्षीय विद्यार्थिनीच्या गालाचा चावा घेत विनयभंग केला. बिहारमधील कटीहार जिल्ह्यात नुकतीच ही संतापजनक घटना घडली. मुलगी चौथ्या वर्गाची विद्यार्थिनी होती. मुख्याध्यापकाने तिला जवळ ओढून तिच्या गालाचा चावा घेतला. अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे मुलीने आरडाओरड केली. त्यामुळे लोक शाळेत धावून आले. त्यांनी व मुलीच्या नातेवाइकांनी मुख्याध्यापकाला बेदम चोप दिला. …
 

पटना : शाळेच्या मुख्याध्यापकाने शाळेतील एका १२ वर्षीय विद्यार्थिनीच्या गालाचा चावा घेत विनयभंग केला. बिहारमधील कटीहार जिल्ह्यात नुकतीच ही संतापजनक घटना घडली.

मुलगी चौथ्या वर्गाची विद्यार्थिनी होती. मुख्याध्यापकाने तिला जवळ ओढून तिच्या गालाचा चावा घेतला. अचानक उद्‌भवलेल्या या प्रसंगामुळे मुलीने आरडाओरड केली. त्यामुळे लोक शाळेत धावून आले. त्‍यांनी व मुलीच्या नातेवाइकांनी मुख्याध्यापकाला बेदम चोप दिला. पोलीस येईपर्यंत नागरिकांनी मुख्याध्यापकाला शाळेच्या खोलीत कोंडून ठेवले. त्‍याला अटक करण्यात आली आहे. मानसिक खच्चीकरण झाल्यामुळे चुकून आपल्याकडून हे कृत्य घडले, असा दावा आरोपी मुख्याध्यापकाने केला आहे.