International News : ३३ व्या वर्षीच ती बनली चक्क आजी! १७ व्या वर्षी झाली आई….

लंडन : वयाच्या ५० वर्षांच्या आसपास अनेकींना आजी होता येतं. मात्र ब्रिटनमधील एका महिलेने चक्क आई होण्याच्या वयात आजी होण्याचा विक्रम केला आहे. या महिलेच्या १७ वर्षांच्या मुलीने या आठवड्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ही महिला नवजात मुलीची आजी असेल यावर कुणाचा विश्वासच बसत नव्हता. मुलीचा जन्म झाल्यावर हॉस्पिटलमधील नर्सने महिलेचे मावशी झाल्याबद्दल …
 

लंडन : वयाच्या ५० वर्षांच्या आसपास अनेकींना आजी होता येतं. मात्र ब्रिटनमधील एका महिलेने चक्क आई होण्याच्या वयात आजी होण्याचा विक्रम केला आहे. या महिलेच्या १७ वर्षांच्या मुलीने या आठवड्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

ही महिला नवजात मुलीची आजी असेल यावर कुणाचा विश्वासच बसत नव्हता. मुलीचा जन्म झाल्यावर हॉस्पिटलमधील नर्सने महिलेचे मावशी झाल्याबद्दल अभिनंदन केले. तेव्हा मी मावशी नाही तर आजी असल्याचे सांगितल्यावर नर्सला आश्चर्याचा धक्का बसला. जेम्मा असं या तरुण आजीबाईचं नाव आहे. मला नातीला बाहेर फिरायला न्यायचं आहे. जेम्मी आजीच्या मोठ्या मुलीचा जन्म २००४ मध्ये झाला. वयाच्या १६ व्या वर्षी ती गर्भवती झाली आणि १७ व्या वर्षी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र जेम्मी आजीच्या मुलीचे लग्न अजून व्हायचे आहे. कारण ती अविवाहित माता आहे. तिचा प्रियकर २१ वर्षांचा आहे.