International News : महिलेने ठेवला १५ लाख रुपये पगाराचा बॉयफ्रेंड! तिच्यापेक्षा २० वर्षांनी लहान; त्याच्याकडून हवं ते करून घेते….

लंडन : नात्यामध्ये वयाचा फारसा फरक पडत नाही असे म्हणतात. त्यामुळे अलीकडच्या काळात पतीपेक्षा पत्नी २ ते ५ वर्षे वयाने मोठी असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र ब्रिटनमध्ये एका महिलेने तिच्यापेक्षा २० वर्षे लहान असलेल्या तरुणाला भाड्याने बॉयफ्रेंड म्हणून ठेवले आहे. विशेष म्हणजे महिलेसोबत बॉयफ्रेंड म्हणून राहण्यासाठी ती त्याला दरमहा १५ लाख रुपये पगार देते. द …
 

लंडन : नात्यामध्ये वयाचा फारसा फरक पडत नाही असे म्हणतात. त्यामुळे अलीकडच्या काळात पतीपेक्षा पत्नी २ ते ५ वर्षे वयाने मोठी असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र ब्रिटनमध्ये एका महिलेने तिच्यापेक्षा २० वर्षे लहान असलेल्या तरुणाला भाड्याने बॉयफ्रेंड म्हणून ठेवले आहे. विशेष म्हणजे महिलेसोबत बॉयफ्रेंड म्हणून राहण्यासाठी ती त्याला दरमहा १५ लाख रुपये पगार देते. द सन या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे.

लंडनमध्ये राहणारी ४५ वर्षीय ज्यूली ही लंडनमध्ये लोकप्रिय डान्सर आहे. तिने स्वतः या नातेसंबंधातील खुलासा केला आहे. तिचा बॉयफ्रेंड हा २५ वर्षांचा तरुण आहे. तिच्यासोबत राहण्यासाठी ज्यूली त्याला दरमहा १५ लाख रुपये देते. मात्र त्याबदल्यात बॉयफ्रेंडकडून तिला जे जे हवे असेल ते काम करून घेते, असेही तिने सांगितले. स्वयंपाक बनविण्यापासून तर स्विमिंग पूल साफ करण्यापर्यंतची सर्व कामे तिचा बॉयफ्रेंड करतो. अनेक लोक तिच्या बॉयफ्रेंडला तिचा मुलगा समजतात, असंही तिने सांगितले.