INFO : ओमिक्रॉनपासून वाचायचे तर हे वाचावे लागेल...
कोरोनाच्या दोन लाटांनंतर संपूर्ण जग कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे चिंतित आहे. ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटमुळे देशभारत भितीचे वातावरण आहे. ओमिक्रॉनपासून वाचायचे असेल तर काही गोष्टींची खबरदार प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. सर्दी, ताप, खोकला, थकवा, मळमळ तसेच उलट्या होणं आणि पुन्हा पुन्हा चक्कर येणं असा त्रास जाणवत असल्यास दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी बुलडाणा लाइव्हला सांगितलं.
ओमिक्रॉन म्हणजे...
ओमिक्रॉन या नव्या प्रकाराला जागतिक आरोग्य संघटनेने ‘चिंतेचा प्रकार’ असे म्हटले आहे. हा विषाणू सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला. यामुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर होऊ शकतात, असे डॉक्टरांनी सांगितले. भारतात आणि त्यातही महाराष्ट्रात आता ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुले प्रशासनाची सुद्धा चिंता वाढली आहे. यापासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. संशोधकांच्या दाव्यानुसार कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आधीच्या व्हेरियंटपेक्षा जास्त धोकादायक आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर आता अनेक देशांत रुग्ण आढळत असल्याने विषाणूचा प्रसार मोठ्या गतीने होत आहे. त्यामुळे या आजाराबद्दल पुरेशी माहिती असणे व आजारांचे लवकर निदान होणे अतिशय आवश्यक आहे.
ही लक्षणे नाहीत ना...
ज्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे त्यांच्यामध्ये काही लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसतात. थकवा जाणवणे, घसा खवखवणे, अंगदुखी, कोरडा खोकला, सौम्य स्नायूदुखी ही लक्षणे असतील ती धोक्याची चिन्हे आहेत, असे समजावे. विशेष म्हणजे रुग्णालयात भरती झाल्याशिवाय सुद्धा त्यातून बरे होणे शक्य आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेतील गंध कमी येणे व चव न लागणे ही लक्षणे ओमिक्रॉनमध्ये सुद्धा दिसून येतात.
लस प्रभावी, पण दोन्ही डोस घ्या...
शासनाने सक्तीचे केलेल्या लसीकरणाचा आता काय फायदा असा प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र कोविडविरुद्धची लस ओमिक्रॉनविरुद्ध प्रभावीपणे लढेल. मात्र दोन्ही डोस घेतल्याची खात्री करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
ही घ्या काळजी...
कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे हा ओमिक्रॉनविरुद्ध लढण्याचा सोपा उपाय आहे. लसीचे दोन्ही डोस घ्या. सुरक्षित शारीरिक अंतर राखा. मास्क लावा. हात नेहमी स्वच्छ धुवा. आजारी व्यक्तींच्या जास्त संपर्कात राहणे टाळा. खोकताना अथवा शिंकताना तोंडासमोर रुमाल धरा. आवश्यक नसेल तर प्रवास टाळा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. प्रवास आवश्यकच असेल तर प्रवासापूर्वी आणि त्यानंतर कोरोना चाचणी करणे अतिशय आवश्यक आहे. या नियमांचे पालन केल्यास ओमिक्रॉनपासून बचाव करणे सोपे होईल.