विधवेसोबत पती पसार! पत्नी पोलिसांना म्हणाली, दोघांना शोधा अन् चांगलीच...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती शंभू मंडल काही दिवसांपासून सर्व कागदपत्रे जपून ठेवत होता. त्याच्या पत्नीने जेव्हा त्याला विचारले, तेव्हा आता बँकेत नोकरी लागणार आहे, असे त्याने सांगितले. त्यामुळे महिलेला काही संशय आला नाही. दुपारी कागदपत्रांची बॅग घेऊन शंभू कुठेतरी निघून गेला. मात्र संध्याकाळ होऊनही तो परतला नाही. त्याचा फोनही बंद होता. त्याचा सगळीकडे शोध घेऊनही तो मिळाला नाही.
त्यामुळे शंभूची पत्नी शेजारच्या रीमा चौधरी या महिलेच्या घरी गेला. तेव्हा रीमासुद्धा गायब असल्याचे समोर आले. रीमाच्या घरात तिने लिहिलेली चिठ्ठी सापडली. "मी माझ्या मर्जीने नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी शंभूसोबत पळून जात आहे. मला वडिलांच्या संपत्तीतून काहीच नको, असे तिने चिठ्ठीत लिहिलं होतं. रीमाच्या नवऱ्याचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून शंभू आणि रीमाचे सूर जुळले होते. त्याचे तिकडे सूर जुळल्याचे त्याच्या बायकोला मात्र खूप उशिरा कळाले. दोघांना शोधा आणि त्यांना चांगली शिक्षा द्या, असे शंभूच्या पत्नीने तक्रारीत म्हटले आहे.