काँग्रेस नेत्याची जीभ घसरली... म्हणाला, ...तर बलात्काराचा आनंद घ्या!

 

बंगलोर : कर्नाटक काँग्रेसचे ज्‍येष्ठ नेते आणि कर्नाटकच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी काल, १६ डिसेंबर रोजी विधानसभेत बोलताना संतापजनक विधान केले आहे. बलात्कार थांबवता येत नसेल तर झोपा आणि बलात्काराचा आनंद घ्या, असे विधान रमेशकुमार यांनी केल्याने त्यांच्या विधानाचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे रमेशकुमार यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी सुद्धा त्यांनी महिलांविषयी अभद्र टिप्पणी केली होती. २०१९ मध्ये कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष असताना त्यांनी स्वतःची तुलना बलात्कार पीडितेशी केली होती. बलात्कार पीडितेवर पुन्हा पुन्हा बलात्कार होत असल्याचा असंवेदनशील विनोद त्यांनी केला होता. त्यानंतर महिला आमदारांनी त्यांच्या विधानाचा निषेध केल्यानंतर त्यांनी माफी मागितली होती.