पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फिटनेसचे सिक्रेट आले समोर! किडनी, लिवर आणि हार्ट साठी अमृत ठरतो हा पदार्थ! मोदींच्या जेवणात असतेच "ही" भाजी..!

 
मुंबई( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, १७ सप्टेंबर रोजी त्यांचा ७२ वा वाढदिवस साजरा केला. या वयातही पंतप्रधान १८ ते २० तास काम करतात. नियमित व्यायाम आणि आरोग्यासाठी पोषक आहार यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या वयातही प्रचंड तेजस्वी दिसतात. वयाच्या सत्तरीत इतकं फिट ते राहतात तरी कसे असे प्रश्न अनेकदा विचारल्या जातात. पंतप्रधान मोदी काय खातात हा प्रश्न साऱ्यांना असतो. त्यामुळे त्यांच्या फिट राहण्याचे रहस्य आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दिवस भल्यापहाटे सुरू होतो. साडेतीन तासांपेक्षा ते जास्त काळ झोपत नाहीत. हे त्यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते. विशेष म्हणजे त्यांच्या शरीराला कमी झोपेची सवय झाली आहे . मोदींनी व्यायाम आणि योगासने केली नाहीत असा एकही दिवस नाही. अगदी ते विदेशात असले तरी व्यायामाला  त्यांनी कधीच अंतर दिले नाही. मुख्यमंत्री होण्याआधी पासून ते नियमितपणे व्यायाम करतात. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुद्ध शाकाहारी आणि अतिशय कमी मसाले असलेले साधे जेवण जेवतात.
   
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जेवणात शेवग्याच्या शेंगांची भाजी, शेवग्याच्या पानांची भाजी किंवा पराठे याचा समावेश असतो. शेवग्याच्या पानांचा पराठा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आवडता पदार्थ आहे. शेवग्याचे झाड हे अतिशय असंख्य गुणांनी समृध्द असते. शेवग्याच्या पानांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शेवगा अतिशय लाभदायी आहे, त्यामुळे शरीरात इन्सुलिन सक्रिय होते. लिवर, किडनी आणि हार्ट साठी सुद्धा शेवग्याची भाजी उत्तम आहे. शेवग्याच्या पानांची भाजी खणाऱ्याला मधुमेह होण्याची शक्यता खूप कमी असते. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेवणाच्या बाबतीत अतिशय शिस्तीचे आहेत. मसालेदार पदार्थपासून ते दूर राहतात. गुजराती जेवण आणि खिचडी हासुद्धा त्यांचा आवडता पदार्थ आहे . त्यांच्या दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश असतो.