जगातला सर्वात श्रीमंत माणूस पुन्हा पडला प्रेमात... जाणून घ्या कोण आहे नवी गर्लफ्रेंड
Feb 22, 2022, 10:56 IST
वॉशिंग्टन : स्पेसएक्स आणि टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जगातील सर्वात श्रीमंत असलेले एलन मस्क सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. तब्बल २३३ अरब डॉलर संपत्तीचे मालक असलेले मस्क वैज्ञानिक प्रयोग आणि भविष्यवाणीमुळे नेहमी चर्चेत असतात. मात्र यावेळी ते चर्चेत येण्याची बात जरा न्यारी आहे. एका वृत्तानुसार एलन मस्क आणि ऑस्ट्रेलियन ॲक्टर्स नताशा बैसेट एकमेकांना डेट करत आहेत. एलन मस्क यांचे याआधी तीनदा लग्न झाले होते. सध्या ते ६ मुलांचे वडील आहेत.
डेलीमेलच्या वृत्तानुसार २७ वर्षीय नताशा ही ५० वर्षीय एलन मस्कच्या संपत्तीने नव्हे तर त्यांच्या प्रतिभेने प्रभावित झाली. नताशा काही वर्षांपासून एलन मस्क यांना फॉलो करीत आहे. आधी दोघांची चांगली मैत्री झाली. आधीची पत्नी सिंगर ग्रिम्सपासून वेगळे होण्याचा निर्णय एलन मस्क यांनी घेतला. त्यानंतर ते नताशाच्या प्रेमात पडले. एका रिपोर्टनुसार मस्क नताशाला तिच्या अभिनय करिअरमध्ये पूर्णपणे सहयोग करतात. नताशा सध्या तिच्या करिअरकडे लक्ष देत आहे.