अरे देवा..! पुन्हा एकदा कोरोनाच्या ओमीक्रॉन व्हेरियंटचे जगासमोर संकट; भारत प्रशासन अलर्ट मोडवर

 
नवी दिल्ली(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): जगभरात जवळपास अडीच वर्ष नुसता धिंगाणा घालून मृत्यूचे तांडव निर्माण करणाऱ्या कोरोनाचा ओमीक्रॉन व्हेरियंट पुन्हा एकदा वेग पकडत आहे. काही देशांत यांची नवी प्रकरणे नोंदवल्या गेली असणाऱ्या भारत प्रशासन याकडे लक्ष ठेवून आहे.  केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी  काल, देशभरातील परिस्थितीचा आढावा घेतला.

 कोरोना विषाणूची सद्यस्थिती आणि लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी काल बैठक घेतली. ओमीक्रॉन स्ट्रेनचे सब व्हेरियंट वेगाने पसरत आहेत, याशिवाय नवीन व्हेरियंट सुद्धा येत आहेत. त्यामुळे आगामी काळात नागरिकांसाठी लागू असलेले नियम पुढे लागू राहतील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. केंद्रीय आरोग्य सचिवांसह अन्य महत्वाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.