NATOINAL NEWS सामुहिक बलात्काराच्या घटनेने देश हादरला! पतीला बेदम मारहाण करून पत्नीची ६ जणांनी लुटली इज्जत! पिडीतेच्या पतीसोबतही अनैसर्गिक बलात्कार! गुप्तांगाला दिले सिगारेटचे चटके

 
बालेश्र्वर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भारतात बलात्काराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दरम्यान ओडिशा राज्यातील बालेश्वर येथून देश हादरवणारी सामूहिक बलात्काराची घटना उजेडात आली आहे. रेल्वेस्टेशन वरून घराकडे परत जात असलेल्या जोडप्याला गाठून ६ जणांनी विवाहितेच्या पतीला बेदम मारहाण केली. आधी विवाहितेच्या पतीवर अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर २८ वर्षीय विवाहितेला ओढत तिच्यावर बाजूच्या शेतात ६ जणांनी आळीपाळीने बलात्कार केला.

प्राप्त माहितीनुसार पीडित जोडपे ओडिशातील मयुरभंज जिल्ह्यातले राहणारे आहेत. विवाहिता आणि तिचा पती काही कामानिमित्त बालेश्वर रेल्वेस्टेशन वर गेले होते. तिथून रात्री साडेनऊच्या सुमारास परत येत असताना ६ जणांनी त्यांना गाठले. विशेष म्हणजे ६ पैकी २ आरोपी अल्पवयीन असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोघांनी विवाहितेला पकडुन ठेवले व इतरांनी तिच्या पतीला बेदम मारहाण केली. तिच्या डोळ्यादेखत दोघांनी तिच्या पतीसोबत अनैसर्गिक अत्याचार केला. विवाहितेच्या पतीच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके सुद्धा देण्यात आले.

 या प्रकारामुळे विवाहितेचा पती बेशुद्ध झाला. त्यानंतर विवाहितेला नराधमांनी शेजारच्या शेतात नेले. तिथे ६ जणांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला आणि फरार झाले. रात्री शुद्धीत आल्यावर विवाहिता पतीला शोधू लागली, तोपर्यंत पती सुध्दा शुद्धीवर आल्याने दोघांची भेट झाली त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जोडप्याने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान ६ पैकी ४ आरोपींना काल, २३ सप्टेंबर रोजी गजाआड करण्यात पोलिसांना यश आले असून अल्पवयीन आरोपी अद्याप फरार आहेत