NATIONAL NEWS निष्काळजीपणाचा कळस! ऑपरेशन करतांना महिलेच्या पोटातच विसरली कैची; ५ वर्षानंतर समजल अन्...
कोझीकोड(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केरळमधल्या कोझीकोड मध्ये डॉक्टरांच्या निष्काळजी पणाचा कळस समोर आला आहे. ऑपरेशन करतांना एका महिलेच्या पोटात डॉक्टर कैची विसरले, आता तब्बल पाच वर्षानंतर हा प्रकार समोर आला असून महिलेने केरळच्या आरोग्य मंत्र्यांकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे.
जाहिरात👇
मिळालेल्या माहितीनुसार हर्षिना असे या महिलेचे नाव आहे. २०१७ मध्ये कोझिकोड येथील मेडिकल कॉलेज मध्ये तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तिच्या पोटात सातत्याने दुखत होते. तिने अनेकदा डॉक्टरांना दाखवले. डॉक्टर गोळ्या ,औषधी खायला द्यायचे मात्र तिच्या पोटदुखीचा तक्रारी सुरू होत्या. गेल्या महिन्यात तिने एका खाजगी डॉक्टरला तक्रार सांगितली.
डॉक्टरांनी सिटी स्कॅन केल्यानंतर जे समोर आल ते ऐकून महिलेला प्रचंड धक्का बसला. २०१७ मध्ये झालेल्या ऑपरेशन दरम्यान महिलेच्या पोटात डॉक्टरांनी कैची विसरल्याचे समोर आले. या प्रकारामुळे महिलेच्या पोटात विषबाधा झाली होती. हे कळल्यानंतर महिला पुन्हा घाईघाईत काझीकोडच्या मेडिकल कॉलेज मध्ये आली, तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करून पोटातली कैची बाहेर काढण्यात आली. दरम्यान या प्रकारामुळे महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी केरळच्या आरोग्य मंत्र्यांकडे प्रकरणाची तक्रार केली आहे.