NATIONAL NEWS खळबळजनक! हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या ६० विद्यार्थिनींचा अंघोळ करतांनाचा व्हिडिओ व्हायरल! मैत्रिणीनेच केले कांड! ८ जणींचा आत्महत्येचा प्रयत्न! प्रकृती गंभीर
या सगळ्या प्रकारामुळे विद्यापीठात एकच गोंधळ उडाला असून रात्री उशिरापर्यंत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या प्रकाराचा निषेध नोंदवला. प्राप्त माहितीनुसार व्हिडिओ बनवणारी सुद्धा एक विद्यार्थिनी आहे. गेल्या काही दिवसांपासून ती मुलींचे अंघोळ करतांना चे व्हिडिओ बनवत होती. ते व्हिडिओ ती शिमला येथील एका तरुणाला पाठवत होती. दरम्यान काल, शनिवारी ते व्हिडिओ इंटरनेट वर व्हायरल झाल्याची माहिती कळताच एकच खळबळ उडाली.
बदनामीच्या भीतीपोटी ८ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. व्हिडिओ बनवणाऱ्या विद्यार्थिनीला विद्यापीठ प्रशासनाने एका खोलीत बंद करून ठेवले, कारण विद्यार्थ्यांचा संतप्त जमाव तिच्यावर हल्ला करण्याच्या बेतात होता. दरम्यान विद्यापीठ व पोलीस प्रशासनाकडून प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकाराची केंद्रीय पातळीवरून चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.