NATIONAL NEWS  हवस का पुजारी! १५ वर्षांच्या भाचीवर मामाचा बलात्कार! भाची गरोदर राहिल्यावर मामा गजाआड..!

 
यमुनानगर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): नात्याला काळीमा फासणारी विकृत घटना हरियाणा राज्यातील यमुनानगर जिल्ह्यात समोर आली आहे. सख्ख्या मामाने भाचीवर बलात्कार करून भाचीला प्रेग्नेंट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पीडित १५ वर्षीय मुलगी तीन महिन्यांची गर्भवती आहे.

 प्राप्त माहितीनुसार यमुनानगर च्या एका कॉलनीत राहणारी १५ वर्षीय मुलगी ९ व्या शिकते. त्याच गल्लीत तिचा २५ वर्षीय मामा संजू वैश हा सुद्धा राहतो. मामा म्हणून तो बहिण्याच्या घरी अनेकदा यायचा. पीडित मुलगी सुद्धा मामाच्या घरी राहत होती. एक दिवस पीडित मुलीची आई व वडील बाहेरगावी गेलेले असल्याने मुलीचा मामा रात्री तिला सोबतीला आला होता. तिच्या आईनेच त्याला मुलीला सोबती जायला सांगितले होते.

मात्र त्या रात्री मामाची नजर फिरली. वासनेची भुक भागविण्यासाठी मामाने भाचीवर त्या रात्री बलात्कार केला. ही बाब कुणालाही सांगू नको अशी धमकी दिली. त्यानंतर अनेकदा तो तिच्या शरीराचा उपभोग घेत होता. दोन दिवसांपूर्वी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला दवाखान्यात भरती करण्यात आले. तपासणी केल्यावर मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितल्यावर मुलीच्या आईला प्रचंड धक्का बसला. मामानेच बलात्कार केल्याचे कळल्यावर पीडित मुलीची आई अक्षरशः प्रचंड हादरली. अखेर स्वतःच्या भावाविरुद्ध पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर बलात्कारासह पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली.