NATIONAL NEWS नवरा म्हातारा झाला म्हणून सासुचा जावयावर जडला जीव! लेकीचा संसार केला उध्वस्त! दोघांनी उचलले धक्कादायक पाऊल..! 

 
जयपूर( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं असं म्हणतात..मात्र राजस्थानच्या बाडमेर मध्ये प्रेमाची एक वेगळीच स्टोरी समोर आली आहे. नवरा म्हातारा झाला म्हणून ४० वर्षीय सासू चक्क स्वतःच्या २५ वर्षीय जावयाच्या प्रेमात पडली. आपल्या प्रेमामुळे आपल्या लेकीचा संसार उद्ध्वस्त होईल याचा जराही विचार तिच्या मनात आला नाही. शेवटी व्हायचा तो परिणाम झाला.. मुलीला आईच्या अन् पतीच्या कारनाम्याची माहिती मिळाल्यानंतर सासू जावयाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

 वर्षाआधी झाले होते लग्न..!
  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक जावयाचे लग्न हे वर्षभराआधी झाले होते. मृतक महिलेची २२ वर्षीय लेक आपल्या नवऱ्याचे कौतुक माहेरी सांगायची.. त्यातच नवरा म्हातारा झाल्यामुळे सासूचा तरुण जावयावर जीव जडला. दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले. सासू जावई अनेकदा एकत्र फिरायला जायचे..त्यामुळे हळूहळू या प्रकरणाची वाच्यता गावपरिसरात होऊ लागली होती.
 
नवऱ्याचे आपल्यावरील प्रेम कमी होत असल्याची जाणीव पत्नीला होऊ लागली होती. त्यामुळे नवऱ्याचे कुठे बाहेर अफेयर तर नाही ना असा संशय तिला होता. नवऱ्याच्या लपून नवऱ्याच्या फोनमध्ये तिने फोन कॉल रेकॉर्डिंग ची सेटिंग करून ठेवली होती. काहीच दिवसांत नवऱ्याचे आपल्या आईशी अफेयर सुरू असल्याचे कळल्यानंतर तिला प्रचंड धक्का बसला.

तिने नवऱ्याला आणि आईला जाब विचारला...मात्र दोघांना काही उत्तर देता आले आहे..प्रकरणाचा बोभाटा गावभर झाल्याचे कळल्यानंतर सोमवारी रात्री सासू आणि जावयाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी दुपारी रस्त्याने जाणाऱ्यांना दोघांचे मृतदेह दिसल्यानंतर हा खळबळजनक प्रकार समोर आला..पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत.