NATIONAL NEWS तुम्हाला माहितेय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जेवणाचा खर्च कोण करत? जाणून घ्या...
Sep 1, 2022, 14:24 IST
नवी दिल्ली( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींना सरकारच्या वतीने विविध सुविधा पुरवल्या जातात. आमदारांना मुंबईत आमदार निवास तर खासदारांना दिल्लीत बंगला दिला जातो. याशिवाय राज्यातले मंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा प्रवास भत्ता, टेलिफोन भत्ता , सुरक्षा, वाहन अशा सुविधा दिल्या जातात.मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती यांना अतिउच्च दर्जाचा सुविधा मिळतात. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत माहिती अधिकारातून एक वेगळी माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जेवणाचा खर्च कोण करत? सरकारी तिजोरीतून त्यावर किती खर्च होतो असा प्रश्न एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने पंतप्रधान कार्यालयाला विचारला होता. पंतप्रधान कार्यालयाने या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जेवणाचा खर्च ते स्वतः करतात. सरकारी तिजोरीतून त्यावर एक रुपयाही खर्च केल्या जात नाही असे उत्तर पंतप्रधान कार्यालयाने दिले आहे.