NATIONAL NEWS अन् संतापलेल्या गावकऱ्यांनी त्याच्या अंडरवेअर मध्ये पेट्रोल टाकून पेटवले! प्रायव्हेट पार्ट जाळला; गावातल्या महीलांसमोर करायचा घाणेरडे कृत्य!
बैतूल जिल्ह्यातील काजली गावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काजली गावातील दिपचंद नावाचा विकृत तरुण महिलांना पाहून अश्लील चाळे करायचा. गावातील महिला शेतात किंवा पाणी आणायला गेल्यावर तो रस्त्यात उभे राहून स्वतःचे कपडे काढायचा आणि प्रायव्हेट पार्ट महिलांना दाखवायचा.
गावातील महिलांनी पुरुषांकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. पुरुषांनी दिपचंद ला समज दिली होती मात्र तरीही त्याच्या वागण्यात कोणताही बदल जाणवत नव्हता. घटनेच्या दिवशी त्याने पुन्हा विकृत कृत्य करत प्रायव्हेट पार्ट महिलांना दाखवाला. त्याचवेळी गावातील सुदेश आणि कृष्णा या तरुणांनी त्याला पकडले. दिपचंद च्या अंडरवेअर मध्ये पेट्रोल टाकून त्याला आग लावली.
यामुळे विकृत दिपचंद चा प्रायव्हेट पार्ट ५० टक्के जळाला. गावातील एका हौदात उडी मारून त्याने त्याचे होणारे मोठे नुकसान टाळले. याप्रकरणात पोलिसांनी प्रायव्हेट पार्ट जाळणाऱ्या तरुणांना अटक केली असून याप्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान विकृत दिपचंद वर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.