वर्गणी गोळा करणे भाजपकडून शिका! पक्षासाठी वर्गणी गोळा करण्यात भाजपा नंबर १! एकाच वर्षात गोळा केले ४,७७,५४,५०,०७७ रुपये!  वाचा कोणत्या पक्षाकडे किती पैसा..!

 
नवी दिल्ली ( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): पक्ष सदस्य नोंदणीत भारतात नंबर एक वर असलेल्या भाजपने पक्षासाठी वर्गणी गोळा करण्यात सुद्धा क्रमांक एकचे स्थान मिळवले आहे. २०२१ - २०२२ या आर्थिक वर्षात पक्षाने तब्बल ४७७ कोटी रूपयांची वर्गणी गोळा केली आहे. विशेष म्हणजे इतर राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत भाजपा वर्गणी गोळा करण्यात बराच पुढे आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पक्षासाठी १ हजार रुपये वर्गणी दिली होती आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षासाठी वर्गणी देण्याचे आवाहन केले होते. भाजपकडे सध्या ४ हजार ८०० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

भाजपच्या तुलनेत मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला गेल्या वर्षभरात केवळ ७४ कोटी रुपये वर्गणी मिळाली. निवडणूक आयोगाने याबद्दलची माहिती सार्वजनिक  केली आहे. भाजपला वर्षभरात ४,७७,५४,५०,०७७ रुपये एवढी वर्गणी मिळाली. भाजपने १४ मार्च रोजी याबद्दलची माहिती निवडणूक आयोगाकडे सोपविली होती. काँग्रेसला ७४ कोटी रुपयांची वर्गणी मिळाली. काँग्रेसकडे सध्या ५८८ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
  
वर्गणी गोळा करण्यात लगातार ७ वर्षे भाजपाच टॉपवर ..
 दरम्यान गेल्या ८ वर्षांपासून भाजपची केंद्रात व देशातील अनेक राज्यात सत्ता आहे. गेल्या ७ वर्षांपासून वर्गणी गोळा करण्यात भाजपा नंबर १ वर असल्याची माहिती समोर आली आहे. २०१९ - २०२० या वर्षांत भाजपा क्रमांक एकवर तर मायावतींचा बसपा पक्ष क्रमांक दोनवर होता. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राजकीय पक्षांना २० हजार रुपयांपेक्षा अधिक वर्गणीची माहिती निवडणूक आयोगाकडे द्यावी लागते. एकूण संपत्तीच्या कर्मावारीत भाजपनंतर काँग्रेस,  बसपा, सीपीआईएम, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व शिवसेना या पक्षांचा क्रमांक लागतो. राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या वर्षभरात ५७ कोटी रुपयांची वर्गणी मिळाली आहे.वर्गणी गोळा करणे भाजपकडून शिका! पक्षासाठी वर्गणी गोळा करण्यात भाजपा नंबर १! एकाच वर्षात गोळा केले ४,७७,५४,५०,०७७ रुपये!  वाचा कोणत्या पक्षाकडे किती पैसा..!

नवी दिल्ली ( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): पक्ष सदस्य नोंदणीत भारतात नंबर एक वर असलेल्या भाजपने पक्षासाठी वर्गणी गोळा करण्यात सुद्धा क्रमांक एकचे स्थान मिळवले आहे. २०२१ - २०२२ या आर्थिक वर्षात पक्षाने तब्बल ४७७ कोटी रूपयांची वर्गणी गोळा केली आहे. विशेष म्हणजे इतर राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत भाजपा वर्गणी गोळा करण्यात बराच पुढे आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पक्षासाठी १ हजार रुपये वर्गणी दिली होती आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षासाठी वर्गणी देण्याचे आवाहन केले होते. भाजपकडे सध्या ४ हजार ८०० कोटी रुपयांची संपत्ती आहे.भाजपच्या तुलनेत मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला गेल्या वर्षभरात केवळ ७४ कोटी रुपये वर्गणी मिळाली. निवडणूक आयोगाने याबद्दलची माहिती सार्वजनिक  केली आहे. भाजपला वर्षभरात ४,७७,५४,५०,०७७ रुपये एवढी वर्गणी मिळाली. भाजपने १४ मार्च रोजी याबद्दलची माहिती निवडणूक आयोगाकडे सोपविली होती. काँग्रेसला ७४ कोटी रुपयांची वर्गणी मिळाली. काँग्रेसकडे सध्या ५८८ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
  
वर्गणी गोळा करण्यात लगातार ७ वर्षे भाजपाच टॉपवर ..
 दरम्यान गेल्या ८ वर्षांपासून भाजपची केंद्रात व देशातील अनेक राज्यात सत्ता आहे. गेल्या ७ वर्षांपासून वर्गणी गोळा करण्यात भाजपा नंबर १ वर असल्याची माहिती समोर आली आहे. २०१९ - २०२० या वर्षांत भाजपा क्रमांक एकवर तर मायावतींचा बसपा पक्ष क्रमांक दोनवर होता. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार राजकीय पक्षांना २० हजार रुपयांपेक्षा अधिक वर्गणीची माहिती निवडणूक आयोगाकडे द्यावी लागते. एकूण संपत्तीच्या कर्मावारीत भाजपनंतर काँग्रेस,  बसपा, सीपीआईएम, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस व शिवसेना या पक्षांचा क्रमांक लागतो. राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या वर्षभरात ५७ कोटी रुपयांची वर्गणी मिळाली आहे.