खळबळजनक! नवऱ्याच्या पासपोर्ट फोटोच्या मागे "मैं बेवफा नहीं हू" लिहीत शिक्षिकेची आत्महत्या! हातावर लिहिले "मै अपनी मर्जी से...!"

 
भोपाळ(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): मध्यप्रदेशातील भोपाळ मध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका विवाहित शिक्षेकेने पतीच्या पासपोर्ट फोटोवर " मैं बेवफा नहीं हू " असे लिहीत आत्महत्या केली. याशिवाय तिने तिच्या हातावर देखील सुसाईड नोट लिहिल्याचे समोर आले आहे.

प्राप्त माहितीनुसार इंदू साहू अस आत्महत्या करणाऱ्या शिक्षिकेचे नाव आहे. विवाहितेचे पती सुभाष साहू हे सुद्धा एका विद्यालयात चित्रकलेचे शिक्षक आहेत. स्वतः सुभाष साहू यांनीच पत्नीच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र विवाहितेच्या माहेरच्यांनी मात्र ही आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप केलाय.

विवाहितेने आत्महत्या करण्यापूर्वी पतीच्या पासपोर्ट फोटोवर "मैं बेवफा नहीं हू" म्हणजेच मी विश्र्वासघातकी नाही असे लिहिले. स्वतःच्या हातावर 'मैं अपनी मर्जी से आत्महत्या कर रही हु, मम्मी पप्पा सॉरी" असेही लिहिले. मात्र तिच्या माहेरच्यांनी मात्र सासरच्या लोकांनीच तिच्या हातावर तसे लिहिल्याचा आरोप केलाय. विवाहितेचा पती सुभाष हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता..त्यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल असे शिक्षिकेच्या माहेरच्या लोकांचे म्हणणे आहे.