CRIME NEWS खळबळजनक!  शेजाऱ्यासोबत पाप करतांना सुनेला सासऱ्याने रंगेहाथ पकडले! सुनेने सासऱ्याला पराठ्यात विष टाकून संपवले! 

 
अलिगढ( लाइव्ह ग्रुप नेटवर्क) अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या वृध्द सासऱ्याला सुनेने पराठयात विष टाकून संपवले. उत्तर प्रदेशातील अलिगढ येथे ही खळबळजनक घटना समोर आली आहे. माझ्या पत्नीने माझ्या वडिलांची हत्या केली अशी तक्रार एका तरुणाने पोलीस ठाण्यात दिल्यानंतर हा प्रकार समोर आलाय.

प्राप्त माहितीनुसार आरोपी महिलेचे शेजारच्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. एक दिवस दुपारी महिलेचा पती कामावर गेलेला असताना शेजारचा तरुण महिलेच्या घरात शिरला. दोघांच्या लीला सुरू असताना वृद्ध सासऱ्याने दोघांना रंगेहाथ पकडले. सासऱ्याने सुनेला समज दिली मात्र घराण्याच्या बदनामी होईल या धाकाने याची वाच्यता केली नाही.
  
मात्र सासऱ्याने रंगेहाथ पकडल्याने एक ना एक दिवस आपले संबंध बाहेर येतीलच अशी भीती सुनेला होती. त्यामुळे सहा दिवसांपूर्वी  सुनेने सासऱ्याला पराठ्यात विष टाकून ते खायला दिले. त्यामुळे सासऱ्याला मृत्यू झाला. दरम्यान घटना घडली तेव्हापासून विवाहित महिला फरार असून नवऱ्याच्या तक्रारीवरून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत.