६ जुगाऱ्यांना पकडून २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त!; खामगाव तालुक्यातील कारवाई
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सार्वजनिक रस्त्यावर जुगाराचा खेळ मांडून बसलेल्या सहा जणांना खामगाव ग्रामीण पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून २७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पारखेड (ता. खामगाव) येथे १३ सप्टेंबरला मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास करण्यात आली.
गौतम पूनाजी बांगर (४२,रा. पारखेड), शेख हुसेन शेख नाधू (६५, रा. नांदुरा), प्रशिक सुभाष गायकवाड (२५), प्रभू किसन बांगर (५५), प्रकाश अवधूत फंदाट (५३), राहुल मधुकर गायकवाड (२५, चौघेही रा. पारखेड) अशी आरोपींची नावे आहेत. एक्का बादशहा नावाचा जुगार पैशाच्या हारजितवर खेळताना या सर्वांना पकडण्यात आले. नगदी ५० रुपये, अंगझडतीत २०० रुपये, ५२ ताशपत्ते किंमती २० रुपये असा एकूण २७० रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडे मिळून आला.