५ हजारांच्या रेतीसह ३ लाखांचा टिप्पर जप्‍त!; खामगाव शहर पोलिसांची कामगिरी

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ५ हजारांची रेती विनापरवाना घेऊन जाणारे ३ लाख रुपयांचे टिप्पर खामगाव शहर पोलिसांनी पकडले. ही कारवाई आज, १६ सप्टेंबरला पहाटे अडीचच्या सुमारास खामगाव शहरातील सातव चौकात खामगाव शहर पोलिसांनी केली. पोलीस अंमलदार जितेश अर्जुन हिवाळे यांच्या तक्रारीवरून तौफीकबेग तस्लीमबेग (२१, रा. माटरगाव ता. शेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल …
 

खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ५ हजारांची रेती विनापरवाना घेऊन जाणारे ३ लाख रुपयांचे टिप्पर खामगाव शहर पोलिसांनी पकडले. ही कारवाई आज, १६ सप्‍टेंबरला पहाटे अडीचच्या सुमारास खामगाव शहरातील सातव चौकात खामगाव शहर पोलिसांनी केली. पोलीस अंमलदार जितेश अर्जुन हिवाळे यांच्‍या तक्रारीवरून तौफीकबेग तस्लीमबेग (२१, रा. माटरगाव ता. शेगाव) याच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. तौफिक हा टाटा कंपनीच्या टिप्परमधून (MH 28 AB 5667) एक ब्रास रेतीची वाहतूक शासनाची रॉयल्टी न भरता करत होता. तपास पोलीस उपनिरिक्षक सम्राट ब्राह्मणे करत आहेत.