हद्द झाली चोरट्यांची… मशिदीच्‍या इमामांनाही नाही सोडले!

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरातील टेबलवर मोबाइल ठेवून झोपणे मशिदीच्या इमामांना चांगलेच महागात पडले. त्यांचे तिन्ही मोबाइल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १८ ऑगस्टला सकाळी समोर आली. या प्रकरणी काल, १९ ऑगस्टला तक्रार देण्यात आल्याने खामगाव शहर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद इमरान नेहाल अहमद (४६) हे इमाम आहेत. तलाव रोडवरील के. के. …
 

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः घरातील टेबलवर मोबाइल ठेवून झोपणे मशिदीच्‍या इमामांना चांगलेच महागात पडले. त्‍यांचे तिन्‍ही मोबाइल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १८ ऑगस्‍टला सकाळी समोर आली. या प्रकरणी काल, १९ ऑगस्‍टला तक्रार देण्यात आल्याने खामगाव शहर पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

मोहम्मद इमरान नेहाल अहमद (४६) हे इमाम आहेत. तलाव रोडवरील के. के. ट्रेडर्ससमोर ते राहतात. त्‍यांच्‍या घराच्‍या दरवाजाला लोखंडी कडीकोयंडा नाही. ते आतून दोरीने बांधून दरवाजा बंद करत असता. त्‍यांच्‍याकडे तीन मोबाइल होते. एक लावा कंपनीचा व दुसरा एमआय कंपनीचा व तिसरा इन्‍फिलेक्स कंपनीचा होता. हे मोबाइल त्‍यांनी १७ ऑगस्‍टला रात्री ११ च्‍या सुमारास घरातील टेबल ठेवून झोपले हाेते. सकाळी ते उठले असता तिन्‍ही मोबाइल आणि शर्टाच्‍या खिशातील नगदी दीड हजार रुपये गायब होते. त्‍यांचे आधारकार्डही नेले.