स्वातंत्र्य दिनाची तयारी करतानाच जिल्हा परिषद शिक्षकावर काळाचा घाला; लोणार तालुक्यातील घटना

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वातंत्र्य दिनाची पूर्वतयारी करताना हिरडव (ता. लोणार) येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला हार्टॲटॅक आला. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही दुर्दैवी घटना आज, १४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. लोणार येथील भारत दशरथ पाटोळे हे हिरडव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. ते …
 

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः स्वातंत्र्य दिनाची पूर्वतयारी करताना हिरडव (ता. लोणार) येथे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाला हार्टॲटॅक आला. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही दुर्दैवी घटना आज, १४ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्‍या सुमारास घडली.

लोणार येथील भारत दशरथ पाटोळे हे हिरडव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. ते आपल्या सहकारी शिक्षकांसोबत शाळेत उद्याच्या स्वातंत्र्यदिनाची तयारी करत होते. त्याच वेळी त्यांना हार्टॲटॅक आला. सहकारी शिक्षकांनी त्यांना लगेच लोणार येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शिस्तप्रिय ,मनमिळावू व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते सुपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले व १ मुलगी असा परिवार आहे.