सासरच्यांनी केला निर्दयी छळ, म्हणून ‘तिने’ मुलासह गाठला विहिरीचा तळ!

सामूहिक आत्महत्येनं घेतले घातपाताचे वळण!! पित्याची तक्रार बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील हतेडी खुर्द येथील माता-पुत्राच्या सामूहिक आत्महत्येने घातपाताचे गंभीर वळण घेतलंय! मृतक महिलेच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सासरच्या 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. लाडक्या लेकीच्या व नातवाच्या भीषण मृत्यूने हादरलेल्या दुर्दैवी पित्याने दिलेल्या तक्रारीत तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात …
 

सामूहिक आत्महत्येनं घेतले घातपाताचे वळण!! पित्याची तक्रार

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील हतेडी खुर्द येथील माता-पुत्राच्या सामूहिक आत्महत्येने घातपाताचे गंभीर वळण घेतलंय! मृतक महिलेच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी सासरच्या 6 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. लाडक्या लेकीच्या व नातवाच्या भीषण मृत्यूने हादरलेल्या दुर्दैवी पित्याने दिलेल्या तक्रारीत तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आले किंवा तिचा लालसेपायी घातपात केल्‍याचा आरोप केला आहे.


बुलडाणा तालुक्यातील हतेडी खुर्द येथील सौ. रुपाली हरिदास चव्हाण व तिचा 6 वर्षीय मुलगा समर्थ यांचे मृतदेह गट क्रमांक 24 मधील सीताराम चव्हाण यांच्या शेतातील विहिरीत 18 मार्चच्या सकाळी आढळले होते. प्रकरणी बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी प्रारंभी आकस्मिक मृत्‍यूची नोंद केली. मात्र रुपालीचे वडील शिवशंकर वाघमारे यांनी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यात रुपालीचा सासरी अतोनात शारीरिक, मानसिक छळ करण्यात येत होता. माहेरहून पैसे आणावे यासाठी तगादा लावण्यात येत होता, असे नमूद आहे. यावरून पती हरिदास चव्हाण, सासरा अर्जुन चव्हाण, सासू विमल चव्हाण, प्रमिला चव्हाण, दीर गजानन चव्हाण, जाऊ स्वाती चव्हाण यांच्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय वसंत रामपुरे आणि शकिल खान तपास करत आहेत.