सकाळी १० ला गेले, अजून घरी परतले नाहीत… अखेर नातेवाइकांनी गाठले खामगाव शहर पोलीस ठाणे!
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सकाळी 10 वाजता कुणाला काही न सांगता घराबाहेर पडलेले 46 वर्षीय संतोष किसन डेलीकर (रा. सुटाळा बुद्रूक, खामगाव) अजूनही परतले नाहीत. नातेवाइकांनी बराच शोध घेतल्यानंतर अखेर खामगाव शहर पोलीस ठाणे गाठून हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. 25 फेब्रुवारीला सकाळी ते निघून गेल्याचे त्यांचा मुलगा आकाशने तक्रारीत म्हटले असून, …
Feb 26, 2021, 16:59 IST
खामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सकाळी 10 वाजता कुणाला काही न सांगता घराबाहेर पडलेले 46 वर्षीय संतोष किसन डेलीकर (रा. सुटाळा बुद्रूक, खामगाव) अजूनही परतले नाहीत. नातेवाइकांनी बराच शोध घेतल्यानंतर अखेर खामगाव शहर पोलीस ठाणे गाठून हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. 25 फेब्रुवारीला सकाळी ते निघून गेल्याचे त्यांचा मुलगा आकाशने तक्रारीत म्हटले असून, नातेवाइकांकडेही त्यांच्याबद्दल माहिती मिळाली नाही. तपास नापोकाँ श्री. मोठे करत आहेत. फिर्यादी – आकाश संतोष डेलीकर