शिंदी येथे चोरट्यांचा हैदोस; ४ लाखाचा ऐवज केला लंपास;
तीन ते चार घरामध्ये चोरीचा प्रयत्न...
शिंदी येथील शरद पंढरीनाथ खरात यांच्या घराच्या मागच्या बाजूच्या दरवाजाची कडी कोंडा तोडून रात्री घरात प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोने एक तोळा पोत, एक तोळा गहू मन्याची पोत, १२ तोळे सोने असा ४ लाखाचा ऐवज लंपास केला. आजच्या बाजार भावाप्रमाणे त्याची किंमत ४ लाखांच्या आसपास आहे. पोलिसांनी शरद
खरात पंढरीनाथ यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुध्द कलम ३३१ (४) ३०५ (ए) ६४ भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल केला आहे.
सदर गावात चोरी झाल्याची माहिती सरपंच अशोक खरात
यांनी ठाणेदार गजानन करेवाड यांना देताच त्यांनी तत्काळ शिंदी येथील घटणास्थळी धाव घेतली. श्वान पथक, फॉरेन्सिक युनिट, फिंगरप्रिंट एक्स्पर्ट चमुला पाचारण करण्यात आले होते. या चमुने घरातील महत्वाच्या
ठिकाणी फिंगरप्रिंट घेतली आहे. तसेच जिवन खरात यांच्या शेतातील बखारीची टेहळणी करीत त्या ठिकाणी दारु बॉटल मिळून आली. ति पोलिसांनी जप्त केली. त्याच बरोबर भगवान वामन बंगाळे यांच्या घराचा कडी कोंडा तोडण्याचा प्रयत्न केला. तर मंगेश बंगाळे यांच्या घराचा सुद्धा कडी कोंडा तोडला होता. एकाच रात्री चार ते पाच ठिकाणी चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याने गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल नितीन राजे जाधव करीत आहेत.