बालकावर अनैसर्गिक अत्‍याचार : आरोपीला गुजरातमधून आणले पकडून; जानेफळ पोलिसांची कामगिरी

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खाऊचे आमिष दाखवत जंगलात नेऊन ११ वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला होता. ही घटना मेहकर तालुक्यातील निंबा शिवारात २ जुलैला घडली होती. याप्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात गणेश शेषराव बुटाले (२५, रा. जानेफळ, ता. मेहकर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या दिवसापासूनच तो फरारी होता. जानेफळ पोलीस त्याचा शोध …
 

मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः खाऊचे आमिष दाखवत जंगलात नेऊन ११ वर्षीय बालकावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला होता. ही घटना मेहकर तालुक्यातील निंबा शिवारात २ जुलैला घडली होती. याप्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात गणेश शेषराव बुटाले (२५, रा. जानेफळ, ता. मेहकर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या दिवसापासूनच तो फरारी होता. जानेफळ पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता. अखेर ७ ऑगस्‍टला जानेफळ पोलिसांनी त्याला गुजरात राज्यातील सुरत येथून अटक केली आहे. जानेफळ येथील या आरोपीने तो राहत असलेल्या भागातीलच बालकावर चाकूचा धाक दाखवत बळजबरीने अनैसर्गिक अत्‍याचार केला होता. या प्रकारानंतर बालकाला वेदना होऊ लागल्याने त्याने आई- वडिलांना घडलेली हकिकत सांगितली. त्‍यानंतर हा प्रकार उजेडात आला होता. बालकाच्या वडिलांनी जानेफळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रकरणाची तक्रार दिली होती.